दापोली (प्रतिनिधी) : जेसीआय दापोलीतर्फे आयोजित ‘जेसीआय दापोली मॅरेथॉन २०२६ सिझन ३’ ही स्पर्धा शनिवारी १० ऑक्टोबर रोजी आझाद मैदान, दापोली येथे मोठ्या उत्साहात पार पडली. ‘रन फॉर पीस, रन फॉर दापोली’ हा शांतता, आरोग्य आणि दापोलीच्या सकारात्मक ओळखीचा संदेश देणार्या या स्पर्धेला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मॅरेथॉनमध्ये तब्बल २४७ धावपटूंनी सहभाग नोंदवला. ५ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये एकूण १४६ स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये १२४ पुरुष आणि २२ महिलांचा समावेश होता. तर २ किलोमीटर फन रनमध्ये एकूण १०१ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये ७८ पुरुष आणि २३ महिला धावपटूंचा समावेश होता. सर्व वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य ठरले. ५ किलोमीटर पुरुष गटात स्वराज जोशी यांनी प्रथम, यश शिर्के यांनी द्वितीय, तर अथर्व चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात सई चव्हाण यांनी प्रथम, दीक्षा कडू यांनी द्वितीय, तर पूजा राजभर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. २ किलोमीटर पुरुष गटात पवन गौड यांनी प्रथम, सुनील रेवाळे यांनी द्वितीय, तर राज राजेशिर्के यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात वैदेही गुरव यांनी प्रथम, सोनाली भागणे यांनी द्वितीय, तर जानवी कांबळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
विजेत्यांना आकर्षक चषक, पदके, प्रमाणपत्रे आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ५ किलोमीटर मॅरेथॉनमध्ये पुरुष व महिला गटांतील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ३,००० रुपये, २,००० रुपये आणि १,००० रुपये, तर २ किलोमीटर फन रनमधील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे १,००० रुपये, ७५० रुपये आणि ५०० रुपये अशी रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले. स्पर्धेच्या प्रारंभप्रसंगी ध्वज दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी दापोलीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग, नगरसेविका साधनाताई बोत्रे, मुख्य प्रायोजक पितांबरी प्रॉडक्ट्सचे पराग साळवी, अरुण गांधी आणि जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून पितांबरी प्रॉडक्ट्सने सहकार्य केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी दापोली पोलीस बांधवांनी मोलाचे सहकार्य केले. सूरज शिगवण यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तसेच प्रांत कार्यालयाकडून विशेष सहकार्य लाभले. या मॅरेथॉनचे विशेष आकर्षण म्हणजे विविध वयोगटांतील स्पर्धकांचा सहभाग. साठ वर्षांवरील तब्बल नऊ ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने धाव घेतली. त्यांच्या जिद्दीचा आणि आरोग्याप्रती असलेल्या बांधिलकीचा गौरव करत त्यांना विशेष पदके प्रदान करण्यात आली. तसेच दहा वर्षांखालील जवळपास चौदा लहान मुलांनीही स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामुळे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांना एकत्र आणणारा हा उपक्रम ठरला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता, सचिव जेसी एचजीएफ रोशन वेदक, प्रकल्प अध्यक्ष जेसी एचजीएफ मयुरेश शेठ, प्रकल्प संचालक जेसी फैझान पुरकर, प्रकल्प समन्वयक जेसी पार्थ साबळे, तसेच जेएफएम तेजस मेहता, जेसीएचजीएफ सीए ऋषिकेश शेठ, जेसी निहाल शिरगावकर आणि जेसीआय दापोलीच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जेएफडी कुणाल मंडलिक यांनी केले.स्पर्धेच्या निमित्ताने स्थानिक माध्यम प्रतिनिधींनीही उपस्थिती लावून उपक्रमाला प्रसिद्धी दिली.

























































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.