loader
Breaking News
Breaking News
Foto

हरवलेली दागिन्यांची पिशवी शोधून परत केली; पाळंदे कट्ट्याचे निलेश परब व शुभांगी परब यांचे साताऱ्याच्या पर्यटकांनी मानले आभार

पाळंदे, दापोली : दापोली तालुक्यातील पाळंदे येथील प्रसिद्ध ‘पाळंदे कट्टा’ या हॉटेलचे सर्वेसर्वा निलेश परब आणि त्यांच्या पत्नी शुभांगी परब यांनी माणुसकीचं उत्तम उदाहरण घालून दिलं आहे. साताऱ्यातून दापोलीत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची पाळंदी बीचवर दागिन्यांची पिशवी हरवली होती. ती पिशवी निलेश परब आणि शुभांगी परब यांनी शोधून काढली आणि पर्यटकांना सुखरूप परत केली. साताऱ्याहून आलेले पर्यटक पाळंदी बीचवर फिरण्यासाठी गेले होते. फिरता फिरता त्यांची दागिन्यांची पिशवी कुठेतरी पडून हरवली. हे लक्षात येताच पर्यटक कुटुंबाची चांगलीच तारांबळ उडाली. दागिन्यांची किंमत मोठी असल्याने ते अत्यंत चिंतेत होते. त्यांनी ही गोष्ट पाळंदे कट्टा हॉटेलमध्ये निलेश परब यांना सांगितली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पर्यटकांचं बोलणं ऐकताच निलेश परब आणि शुभांगी परब यांनी एक क्षणही न दवडता स्वतः बीचवर जाऊन शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अखेर त्यांना ती दागिन्यांची पिशवी सापडली. पिशवी मिळताच त्यांनी ती तातडीने पर्यटकांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिली. आपली मौल्यवान दागिन्यांची पिशवी परत मिळाल्याने साताऱ्याच्या पर्यटकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी निलेश परब आणि शुभांगी परब यांचे मनःपूर्वक आभार मानले व मनःपूर्वक अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

आजच्या काळात सापडलेली वस्तू स्वतःकडे ठेवण्याची प्रवृत्ती वाढत असताना, परब दाम्पत्याने दाखवलेला प्रामाणिकपणा हा खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. दापोलीमध्ये माणुसकी अजून जिवंत आहे, याचं हे उत्तम उदाहरण असल्याची भावना यावेळी पर्यटकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे पाळंदे कट्टा हॉटेलचे नाव तर उंचावलेच, शिवाय संपूर्ण दापोली तालुक्याच्या पर्यटनालाही एक चांगला संदेश गेला आहे. प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपणाऱ्या परब दाम्पत्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg