loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते साहिल पठाण यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

रत्नागिरी प्रतिनिधी:-रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्ते साहिल इशाक पठाण यांची विशेष कार्यकारी अधिकारी (special executive officer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारसीनुसार त्यांची ही निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.साहिल इशाक पठाण हे रत्नागिरी परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर आता या पदाच्या अनुषंगाने जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राप्त माहितीनुसार, ही नियुक्ती १४ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाली असून, १३ ऑक्टोबर २०३१ पर्यंत म्हणजेच पाच वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या साहिल पठाण यांना या नियुक्तीमुळे सार्वजनिक कामकाजात योगदान देण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

महाराष्ट्र शासनाच्या प्रमाणपत्रानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील साहिल इशाक पठाण यांना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. या नियुक्तीबद्दल साहिल पठाण यांचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg