loader
Breaking News
Breaking News
Foto

बालकलाकारांचा आधारवड प्रा. मंदार टिल्लू हरपल, रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास

ठाणे (प्रतिनिधी) : गेली 25 वर्ष बालरंगभूमीसाठी कार्यरत असणारे नाट्यदिग्दर्शक, निर्माते आणि गंधार कला संस्थेचे अध्यक्ष एक यशस्वी वाणिज्य शाखेचे प्राध्यापक मंदार टिल्लू यांचे बुधवारी ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने ठाण्याच्या सांस्कृतिक आणि नाट्यविश्वातील एक यशस्वी व्यक्तिमत्त्व हरपले आहे. बुधवारी दुपारी त्यांचे अंतिमसंस्कार बाळकूम येथील स्मशानभूमीत पार पडले. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्यसृष्टीसह बालरंगभूमीच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर नाट्यसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रा. मंदार टिल्लू हे गेली 23 वर्ष कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे प्राध्यापक 25 वर्ष बालरंगभूमीसाठी कार्यरत एक रंगकर्णी, प्राध्यापक ते दिग्दर्शक असा प्रवास आहे. त्यांनी आत्तापर्यंत शंभरून अधिक बालनाट्यांच दिग्दर्शन जंतर-मंतर पोरं बिलंदर, व्यक्ती आणि वल्ली यापैकी काही गाजलेली नाटक 80 कलावंत असलेल्या शिवबा या महानाट्याचे दिग्दर्शन बालसुरांच्या मैफिलीत, कोमल गंधार, पी सावळाराम संगीत प्रवास, गीत गजानन इत्यादी अशा अनेक वाद्यवृद्धाचे दिग्दर्शन अनेक ठिकाणी सूत्रसंचालन आणि निवेदन पुरस्कार दिग्दर्शनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

टाईम्स स्पेशल

बालरंगभूमीच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे होते. त्यांच्या निधनामुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि नाट्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बालरंगभूमीच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणार आहे. त्यांच्या जाण्याने अनेक बालकलाकारांनी आपला मार्गदर्शक गमावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg