loader
Breaking News
Breaking News
Foto

अवनी नेनेची रशियातील पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड, वाडा हायस्कूलमध्ये शुभेच्छा समारंभ उत्साहात

देवगड (प्रतिनिधी) - वाडा येथील अनंत कृष्ण केळकर हायस्कूलची माजी विद्यार्थिनी अवनी विनायक नेने हिची रशियातील सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी प्रशाला, स्थानीय समिती व शालेय समितीच्या वतीने तात्या भिडे सभागृहात शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अवनी हिने दहावीपर्यंतचे शिक्षण वाडा हायस्कूलमध्ये, तर बारावीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरी येथे पूर्ण केले. त्यानंतर रशियातील विद्यापीठाची प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करत तिने उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. तिच्या या यशामुळे वाडा हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या निवडीबद्दल शाळा व सं स्थेच्या वतीने अवनी आणि तिच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

यावेळी स्थानीय समितीचे अध्यक्ष शांताराम पुजारे, हर्षद जोशी, स्थानीय समिती सदस्य विश्वजित सातवळेकर, मुख्याध्यापिका स्मिता तेली, अवनी नेने व तिच्या पालक स्वानंदी नेने उपस्थित होत्या. अवनी नेने, स्वानंदी नेने, हर्षद जोशी, विश्वजित सातवळेकर आणि शांताराम पुजारे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण दातार यांनी केले. मुख्याध्यापिका स्मिता तेली यांनी प्रास्ताविक केले, तर सचिन मोरे यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg