loader
Breaking News
Breaking News
Foto

‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची वेंगुर्ल्यात विशेष बैठक

मालवण (प्रतिनिधी) : 'गाव तिथे उद्योजक' ही संकल्पना गावातून तालुक्याकडे, तालुक्यातून जिल्ह्याकडे आणि जिल्ह्यातून थेट राष्ट्रापर्यंत जोडली जाणार आहे. गावातील गरजू व्यक्ती आणि तरुणांना उद्योजकतेची संधी देण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी स्वतःच्या व्यवसायातून प्रगती साधावी, यासाठी मसिआ सुरुवातीपासून व्यवसाय उभारणीच्या विविध टप्प्यांपर्यंत सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मसिआचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजेंद्र केसरकर यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले. ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग-व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA-मसिआ) यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘गाव तिथे उद्योजक’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेची विशेष बैठक सोमवारी वेंगुर्ला पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वेंगुर्ला तालुक्यातील प्रत्येक गावात किमान एक यशस्वी उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून ठेवण्यात आले आहे. या संकल्पनेमुळे ग्रामीण भागातील तरुणांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या बैठकीला मसिआचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजेंद्र केसरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल वालावलकर, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य कुणाल वरसकर आणि कार्यालयीन समन्वयक आग्नेल फर्नांडिस, तसेच वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, विस्तार अधिकारी गुरुनाथ धुरी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

पंचायत समिती प्रशासन, ग्रामपंचायती आणि मसिआ यांच्यात समन्वय साधून हा उपक्रम प्रभावीपणे राबविल्यास वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण उद्योगांना नवी दिशा मिळू शकते. स्थानिक साधनसंपत्तीचा उपयोग, तरुणांना व्यवसायाभिमुख मार्गदर्शन आणि नव्या उद्योगांची उभारणी यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने ‘गाव तिथे उद्योजक’ ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg