loader
Breaking News
Breaking News
Foto

युवा महोत्सवात कीर विधी महाविद्यालयाची सुवर्णभरारी, मराठी वादविवाद स्पर्धेत सोहम रिसबूड आणि मनाली शेलार यांना सुवर्णपदक!

रत्नागिरी (जमीर खलफे) : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अमोघ वक्तृत्वाच्या आणि तार्किक मांडणीच्या जोरावर मराठी वादविवाद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोहम रिसबूड आणि मनाली शेलार या वादपटू जोडीने हे सुवर्ण यश मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे, सोहम रिसबूड याने याच महोत्सवात इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत (गट-ब) तृतीय पारितोषिक देखील पटकावले आहे. या दुहेरी यशामुळे महाविद्यालयात सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. विद्यापीठाच्या या अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत संपूर्ण विभागातून आलेल्या मातब्बर महाविद्यालयांच्या संघांना मागे टाकत भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या सोहम आणि मनाली या वादपटूंनी विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, अचूक युक्तिवाद आणि प्रतिपक्षाच्या मुद्द्यांचे खंडन करत परीक्षकांचे मन जिंकले आणि विजेतेपदावर आपले नाव कोरले.

टाईम्स स्पेशल

हे दोन्ही विद्यार्थी महाविद्यालयात एलएलबी ५ वर्षे कोर्सच्या शेवटच्या वर्षात शिकत असून, त्यांना या स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संयोगिता सासने तसेच प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या अभूतपूर्व यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे व सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg