loader
Breaking News
Breaking News
Foto

निगुडे येथे ४ हजार मीटर ऑप्टीकल फायबर केबलची चोरी; २५ हजारांचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) - निगुडे पाटीलवाडी ते मडुरा तिठा दरम्यान इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी टाकण्यात आलेली सुमारे ४ हजार मीटर लांबीची ऑप्टीकल फायबर केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी इंटरनेट प्रोव्हायडर विजय गोविंद सावंत (वय ४०, रा. भटवाडी, ता. सावंतवाडी) यांनी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.५० या कालावधीत निगुडे पाटीलवाडी ते मडुरा तिठा दरम्यान टाकण्यात आलेली काळ्या रंगाची ऑप्टिलिंक कंपनीची ५.८ ओडी, ४ एफ प्रकारची सुमारे ४ हजार मीटर ऑप्टीकल फायबर केबल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नाईक करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg