loader
Breaking News
Breaking News
Foto

दि. ३ नोव्हेंबर रोजी गुहागर पंचायत समितीची आमसभा

वरवेली (गणेश किर्वे) - पंचायत समिती गुहागरची सन २०२५/२६ या वित्तीय वर्षाची आमसभा गुहागरचे कार्यसम्राट आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ११ वा. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील श्री. पूजा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांनी - आपली निवेदने वेळीच लेखी स्वरूपात पंचायत समिती गुहागर कार्यालयाकडे - दिनांक २२ ऑक्टोबर रोजी - सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५ प्रतीत सादर करावीत. (प्रत्येक निवेदने ही स्वतंत्र A 4 कागदावर असावीत)

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याव्यतिरिक्त मुदतीनंतर येणारी लेखी निवेदनेही स्वीकारली जातील तसेच सदर दिवशी नागरिकांना आपले प्रश्न समक्ष देखील मांडता येतील. तरी गुहागर तालुक्यातील नागरिकांनी या आमसभेला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा आमसभेचे सचिव प्रदीप शिंदे यांनी प्रसिद्धीपत्त्रकाद्वारे केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg