loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथील भीषण अपघातात जखमी झालेल्या आडवलीतील तरुणाचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नजीक आंजणारी पुलावर शुक्रवारी पहाटे ट्रक आणि खासगी लक्झरी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या आडवली-तांबळवाडी येथील रघुवीर उर्फ किरण बाळकृष्ण मसुरकर (वय ३५) यांचा उपचारादरम्यान शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने आडवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

किरण मसुरकर हे दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्यासाठी पत्नी व एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीसह मुंबईला गेले होते. सण साजरा केल्यानंतर पत्नी व मुलीला मुंबईतच ठेवून ते खासगी बसने मालवणच्या दिशेने गावी परतत होते. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आंजणारी पुलावर बस आणि सोळाचाकी ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांतील चालकांसह २६ हून अधिक प्रवासी जखमी झाले. यामध्ये किरण मसुरकर यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

टाईम्स स्पेशल

दिवाळीचा आनंद साजरा करून गावी परतणाऱ्या किरण यांच्यावर नियतीने असा घाला घातल्याने त्यांच्या पत्नी आणि चिमुकल्या मुलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी रात्री आडवली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक वर्षाची मुलगी, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मसुरकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आडवली परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg