खेड (परेश खोपडे) - ग्रामीण भागातील घरासमोर 'अंगण' म्हणजे घरासमोरील शोभा. पावसाळा संपल्यानंतर या अंगणाची 'वलय' करण्याची म्हणजेच अंगण करण्याची लगबग सुरू व्हायची. पण, काळ बदलला तसा गावात पहाटे पहाटे येणारा चोपण्यांचा आवाजही आता कानावर पडत नाही. साधारणपणे सर्वपित्री अमावास्या झाली की गावागावात पावसाळा संपला की घरासमोरील अंगणाची 'वलय'करण्याची परंपरा होती. घरासमोरील अंगणाची 'वलय झाल्यानंतर त्यावर शेणाचा सडा टाकल्यानंतर घराला घरपण यायचं. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची वलय करण्यासाठी लगबग सुरु व्हायची. वर्षभर शेतात केलेली मेहनत म्हणजेच भातशेती कापणीची सुरुवात व्हायची. साधारणपणे याच कालावधीत हालवी भातशेती मोठ्याप्रमाणात कापणीसाठी तयार होते. भातं कापून झाल्यावर भाताचे भारे अंगणात आणून ठेवले जायचे आणि संध्याकाळी याच भाताची मळणी केली जायची.
घरासमोरील अंगण म्हणजेच घराची शोभा. याच अंगणात मांडव घातला जायचा व घराच्या शोभेत भर टाकली जात. कोकणातील कौलारू घरे आणि घरासमोरील अंगण व अंगणाला 'मांडव' घातला जातौ. हे दृश्य काही प्रमाणात आता लोप पावत असले तरी काही शेतकरी अजूनही या परंपरा जोपासताना दिसत आहेत. अंगणात शेणाचा सडा व त्यावर काढलेली रांगोळी दृश्य पाहिल्यावर मनाला समाधान वाटायचे. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार व ग्रामीण भागात मजुरांची कमी उपलब्धता यामुळे या अंगणात आता कायमस्वरूपी पत्राशेड व वलयच्या ऐवजी आता लादी बसविणे हे चित्र सगळीकडे दिसत आहे. गर्मीच्या दिवसांत या सारवलेल्या अंगणात मांडवाखाली बसणै म्हणजे सुखद गारवा मिळायचा.
सध्या मात्र ग्रामीण भागात सकाळी सकाळी चोपण्यांचा आवाज कानावर पडणे दुर्मिळ होऊन बसले आहे. ग्रामीण भागातील वाढलेले शहराकडील स्थलांतर. घराघरात सध्या वास्तव्यास असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना हे बदलेल चित्र स्वीकारताना थोडं जड जात आहे. पण नाईलाज म्हणून या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करणे त्यांना भाग पडत आहे. आमच्याने जोपर्यंत होत होते तोपर्यंत आम्ही हे सर्व करत होतो. आता मात्र हातपाय थकले. शरीर साथ देत नाही. यामुळे हे सर्व फक्त उघड्या डोळ्यांनी पाहत बसावे लागते अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातील वयोवृद्ध लोकं देताना दिसत आहेत.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.