loader
Breaking News
Breaking News
Foto

अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड तक्रारींची तात्काळ चौकशी करा; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

रत्नागिरी; अनधिकृत गॅस कनेक्शन आणि रेशन कार्ड वाटपासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय 'लोकशाही दिन' कार्यक्रमात ते बोलत होते. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या अर्जांचा व प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. नागरिकांच्या तक्रारींची वेळेत पडताळणी करून सर्व विभागांनी प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच सांडपाणी व्यवस्थापनाबाबत बिल्डरविरोधात दाखल तक्रारीवर एमएसआरडीसीने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीदरम्यान सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा आढावा घेण्यात आला. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधी संकलन ही महत्त्वाची संधी असल्याचे सांगत, सर्व विभागांनी आठवडाभरात आपले दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून निधी जमा करावा व आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी केले. या लोकशाही दिनाला अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एम. एस. कुलकर्णी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव व सागर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद्र बिरादार आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg