loader
Breaking News
Breaking News
Foto

माणगांव तालुक्यातील साई परिसरात खैरावाडी येथे वणवा लागून वन्यसंपत्ती नष्ट

माणगांव (हरेश मोरे) - माणगांव तालुक्यातील साई परिसरातील खैरावाडी येथे अज्ञात इसमाने वणवा वणवा लावून प्राण्यांची वनसंपत्ती नष्ट केली असून माणगांव वनविभागाने वणवे लावू नये याबाबत जनजागृती करावी, अशी साई परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. पाऊस कमी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून पिके हातची गेल्यामुळे शेतकरी वर्गांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वणव्यामुळे गुरांचा चारा जळून खाक होत असल्यामुळे अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही अज्ञात व्यक्ती जाणूनबुजून वणवा लावत असल्यामुळे गु्रांसाठी असलेला चारा नष्ट होत असून या वणव्यात वनसंपदा व अनेक वन्य प्राणी, पक्षी देखील होरपळून नष्ट होत असून अन्नाच्या शोधात असणारे वन्य प्राणी भुकेने मारले जात आहेत. तरी माणगांव वनविभागाने शेतकऱ्यांजवळ संपर्क करून वणवे लावणे कस बंद होतील याबाबत जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg