देवळे (प्रकाश चाळके) - साखरपा परिसराशी बालपणापासून असलेले नाते आणि येथील जंगलाशी असलेली जवळीक यातून साकारलेल्या ‘झाड आजोबा’ या लघुपटाच्या चित्रीकरणाला साखरपा परिसरात सुरुवात झाली आहे. साखरपामधील दिग्दर्शक सुरज मधाळे या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन करीत आहेत. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) अंतर्गत DCDFC निधीसाठी देशभरातून निवड झालेल्या १० फिल्मकारांच्या प्रकल्पांमध्ये ‘झाड आजोबा’ची निवड झाली आहे. या निधीसाठी निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये सुरज मधाळे यांचा समावेश आहे. साखरपा परिसरात बालपणापासून वास्तव्य असल्याने येथील जंगल, निसर्ग आणि स्थानिक जीवनाशी त्यांचे भावनिक नाते आहे. याच अनुभवातून ‘जंगलाची एक गोष्ट सांगावी’ या भावनेतून ‘झाड आजोबा’ या चित्रपटाची संकल्पना आकाराला आली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाची पूर्वतयारी सुरू होती. आता प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
माणूस आणि जंगल यांच्यातील नाते, निसर्गाविषयीची जबाबदारी आणि जंगलाला आपल्या कुटुंबाचा भाग मानणाऱ्या एका आजोबांची कथा या लघुपटातून मांडण्यात येणार आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण साखरपा परिसरातील नैसर्गिक लोकेशन्सवर करण्यात येत आहे. ‘झाड आजोबा’च्या कलाकारांच्या संचामध्ये साखरपा परिसरातील स्थानिक कलाकारांसोबतच मराठी चित्रपटसृष्टीतील काही दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिक कलाकार आणि अनुभवी व्यावसायिक कलाकारांचा एकत्रित सहभाग या चित्रपटाचे विशेष वैशिष्ट्य ठरत आहे. लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सुरज मधाळे, सहलेखन संघर्ष माने, छायाचित्रण अश्विन चिडे, प्रॉडक्शन डिझाइन विष्णू भांडवलकर, कार्यकारी निर्मिती विपुल देशमुख आणि ध्वनी रवी कुमार यांच्याकडे आहे. तसेच महेश राईन हे स्थानिक निर्मिती प्रमुख म्हणून, तर अतुल शिर्के हे कास्टिंग दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
या चित्रपटांमध्ये फिल्मस्टार शशांक शिंदे यांची प्रमुख भूमिका असून येथील स्थानिक कलाकार राजाभाऊ मोरे, चंद्रकांत पावसकर, अतुल शिर्के, बंड्या साळस्कर, सागर चव्हाण, भिकाजी पवार, महेश राईन, संतोष चव्हाण व स्थानिक पत्रकार प्रकाश चाळके, शंकर वैद्य यांनी काम केले आहे. तसेच किरबेट, देवडे, भोवडे, साखरपा या ठिकाणी "झाड आजोबा" या लघु चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण झाले आहे. कोकणातील जंगल, डोंगर, ओढे आणि परिसरातील नैसर्गिक वातावरण हे ‘झाड आजोबा’च्या कथानकाचा महत्त्वाचा भाग आहे. स्थानिक परिसरातच चित्रीकरण होत असल्याने साखरपा आणि कोकणच्या निसर्गाचे वेगळे दृश्यरूप या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. साखरप्याशी असलेले वैयक्तिक नाते आणि जंगलाशी जोडलेली भावनिक गोष्ट यामुळे ‘झाड आजोबा’ हा प्रकल्प माझ्यासाठी विशेष आहे, असे दिग्दर्शक सुरज मधाळे यांनी सांगितले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.