खेड : रस्त्याने चालताना अचानक दगडाला ठेच लागून खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या मंडणगड तालुक्यातील कुंबळे येथील एका ५९ वर्षीय व्यक्तीचा मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. विनोद महादेव गायकवाड (वय ५९, रा. कुंबळे पाटीलवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांची वानवा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, वेळेत पुरेशी आरोग्य यंत्रणा न मिळाल्याने रुग्णाला मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास विनोद गायकवाड हे गावात फिरत असताना कुंबळे बस स्टॉपजवळ त्यांचा पाय एका दगडाला ठेचकळला. तोल गेल्याने ते थेट डोक्यावर आपटले आणि त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला.
घटनेचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तातडीने कुंबळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना तात्काळ मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी डोक्याला अंतर्गत दुखापत झाल्याचा संशय व्यक्त करत तातडीने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. मंडणगड शहरात सीटी स्कॅनची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना पुढील तपासणीसाठी रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. माणगाव येथे सीटी स्कॅन केल्यानंतर गायकवाड यांच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्रावामुळे रक्ताच्या गाठी झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र तेथेही अशा गुंतागुंतीच्या उपचारासाठी आवश्यक त्या अद्ययावत सुविधा उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्यांना मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नातेवाईकांनी धावपळ करत १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांना मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात दाखल केले.
जे. जे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना दुसर्या दिवशी, म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी प्रकरणाची सर्व कागदपत्रे टपालाद्वारे पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांकडे वर्ग केली. त्यानुसार मयत व्यक्तीचा मुलगा विजय विनोद गायकवाड यांच्या खबरीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक २०/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.