loader
Breaking News
Breaking News
Foto

रसायनीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानातून स्वच्छतेचा संदेश

रसायनी (प्रतिनिधी) : स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, पाताळगंगा यांच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत रसायनी-पाताळगंगा परिसरात स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी मोहोपाडा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अधिकारी, वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी एकत्रितपणे रस्ते तसेच परिसराची स्वच्छता केली. यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करून तो पिशव्यांमध्ये भरून घंटागाडीत जमा करण्यात आला. संकलित करण्यात आलेल्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, पाताळगंगाचे प्रेसिडेंट सुंदर राजन रंगराजन व पंकज यादव, तसेच थॉमस इसो, अचिंत्य चक्रवर्ती, रिशेल गडाख, संतोष विचारे, केतन नाईक, रामदास मदने, रामदास भांड यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. अभियानादरम्यान उपस्थितांनी स्वतःची, घराच्या आजूबाजूची, गावाची तसेच कंपनी परिसराची स्वच्छता राखण्याची प्रतिज्ञा घेतली. स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg