loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर डोंगर या दुर्गम गावातील कन्या ओवी संदीप पवार हिचे नासा परीक्षेत भव्य यश , अमेरिका दौऱ्यासाठी भरभरून शुभेच्छा !

राजापूर ( वार्ताहर): तालुक्यातील डोंगर या दुर्गम गावातील कन्या ओवी संदीप पवार हिने जि. प. रत्नागिरी मार्फत घेण्यात आलेल्या नासा भेट परीक्षेत यश संपादन केले असून ती आता प्रत्यक्ष अमेरिका दौऱ्यावर जात आहे. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी डोंगर गावचे उद्योजक-साखरकर बेकरीचे मालक सिराज साखरकर, विलये गावचे उपसरपंच अजय तावडे, कणेरी गावाचे माजी सरपंच महेश कण्हेरे, माजी केंद्र प्रमुख विनायक खानविलकर, ओवीचे वडील संदीप पवार (शिक्षक), आई भक्ती पवार (ग्रामपंचायत अधिकारी) आजी ऊर्मिला पवार (माजी सरपंच) व घरातील सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परिषदेमार्फत मागील काही वर्षांपासून इसरो आणि नासा भेटीसाठी मुलांच्या चाळणी परीक्षा घेऊन त्यांची प्रत्यक्ष संशोधन केंद्रांना भेट देण्याचा महत्वपूर्ण कार्यक्रम आखला आहे. तसेच संपूर्ण प्रवासात त्यांची उत्तम व्यवस्था शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद करत आहे. यापूर्वी इसरो भेट परीक्षेत यश संपादन करून ओवीने भारतातील बेंगलोर, गोवा यांसारख्या इसरोच्या केंद्रांना भेट दिली आहे. ओवी पवार ही विश्वनाथ विद्यालय राजापूर या शाळेची विद्यार्थिनी आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg