खेड, रत्नागिरी : कोकणवासीयांचे श्रद्धास्थान आणि लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या खेडमधील श्रीदेवी काळकाई माता तसेच जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवीच्या नवरात्रोत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. दोन्ही मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना करण्यात आली असून, नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास भाई कदम यांनी सपत्नीक उपस्थित राहत श्रीदेवी काळकाई माता आणि श्री कोटेश्वरी मानाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दोन्ही देवींची पारंपरिक पद्धतीने खणा-नारळाने ओटी भरून मनोभावे पूजा केली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवींच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
श्रीदेवी काळकाई मातेला शासकीय मानवंदना: खेडमधील श्रीदेवी काळकाई मातेच्या नवरात्रोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देवीला देण्यात आलेली शासकीय सलामी. पोलीस दलाच्या वतीने देण्यात आलेल्या या शासकीय मानवंदनेमुळे धार्मिक सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कोकणातील भाविकांच्या मनात श्रीदेवी काळकाई मातेबद्दल असलेली श्रद्धा आणि भक्तिभाव या उत्सवातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि पिकांवरील संकटामुळे शेतकरी चिंतेत असताना, बळीराजावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे, शेतीला चांगले दिवस येऊ देत आणि सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना काळकाई मातेकडे करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि कोकणातील शेतीला नवसंजीवनी मिळावी, अशी भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे.नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच खेडमधील श्रीदेवी काळकाई माता आणि जामगे येथील श्री कोटेश्वरी मानाई देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत असून, पुढील नऊ दिवस देवीच्या पूजाअर्चा आणि दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती राहणार आहे. श्रद्धा, परंपरा आणि धार्मिक उत्साहाचा संगम साधणाऱ्या या नवरात्रोत्सवाला कोकणवासीयांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.


.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)




















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.