loader
Breaking News
Breaking News
Foto

वयाच्या ८३व्या वर्षी गणपत गावकर यांची भाजपा ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

मंडणगड (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील ढोक्रवली गावकरवाडी येथील निवृत्त ग्रामविकास अधिकारी गणपत गावकर यांची वयाच्या ८३व्या वर्षी भाजपा ओबीसी सेल, उत्तर रत्नागिरीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा ओबीसी सेल, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सचिन थोरे यांनी ही नियुक्ती केली. नियुक्तीबद्दल गणपत गावकर यांचा भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी च्या वतीने जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी ढोक्रवली या गावी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. गणपत गावकर यांनी मंडणगड तालुक्यात ग्रामविकास अधिकारी म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी सामाजिक क्षेत्राशी असलेली नाळ कायम ठेवत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच त्यांनी भाजपा जिल्हा निमंत्रक सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अभिजीत देवळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “गणपत गावकर यांचे वय ८३ वर्षांचे असले तरी समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची ऊर्जा आणि जिद्द आजही तरुणांना प्रेरणा देणारी आहे. शासकीय सेवेत असताना त्यांनी गावपातळीवर विकासकामांसाठी योगदान दिले आणि निवृत्तीनंतरही स्वतःला सामाजिक कार्यासाठी झोकून दिले. पद, वय किंवा परिस्थिती यापेक्षा समाजासाठी काम करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची असते, हे गावकर यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा पक्षाच्या संघटनात्मक व सामाजिक कार्याला निश्चितच फायदा होईल. वयाच्या या टप्प्यावरही त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहे.”

टाईम्स स्पेशल

गणपत गावकर यांच्या नियुक्तीमुळे ढोक्रवली परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या अनुभवाचा पक्षाच्या संघटनात्मक कार्यासाठी उपयोग होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते, चिपळूण तालुका ग्रामीण महिला अध्यक्षा वैष्णवी राजे-शिर्के, बूथ अध्यक्ष गणपत राणीम, बाळ घवाळे, दिनेश घवाळे, महेंद्र वामणे, योगेश राणीम, अशोक मोहिते, सोमा राणीम, विजय जोशी, कृष्णा मोहिते, प्रशांत राणीम, दीपक मोहिते, दक्षता मोहिते, किरण कुंडूगळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg