loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशीत वृक्षतोड बंदी केवळ कागदावरच? यापूर्वी वनविभागाचा ४ लाखांचा दंड, आता परवानग्यांसह वृक्षतोड आणि उत्खननाच्या चौकशीची गरज

तिलारी (प्रतिनिधी) : निसर्गसंपन्न दोडामार्ग तालुक्यात निवासी प्लॉटिंग प्रकल्प, फार्महाऊस आणि रिसॉर्टच्या नावाखाली होणारी वृक्षतोड व डोंगराळ जमिनीचे सपाटीकरण हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे. तालुक्यात वृक्षतोडीवर निर्बंध असतानाही विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असल्याचे आरोप पुढे येत आहेत. परप्रांतीय गुंतवणूकदार आणि विकासकांच्या वाढत्या जमीन खरेदी-विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पर्यावरणाचे संरक्षण नेमके कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, येथील एका प्रकल्पाला मागील वर्षी वन विभागाकडून सुमारे ४ लाखांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती वन कर्मचार्‍यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात साटेली भेडशी ग्रामपंचायतीची भूमिकाही तपासण्याची आवश्यकता असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी टाइम्स डिजीटलकडे बोलताना सांगितले. आम्हाला विकास हवा आहे, पण विनाशकारी विकास नको. वनसंपत्ती राखण्याचे जबाबदारी फक्त ग्रामस्थांची नसून बाहेरुन येणार्‍या उद्योजकांनी याची काळजी घ्यायला हवी, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. उद्योजकांनी बाहेरुन येवून व्यवसाय सुरु करताना वृक्षतोड व उत्खननाच्या बाबतीत निसर्गाची काळजी घ्यायला हवी, अन्यथा भविष्यात येथील नद्या, नाळे मातीने भरुन जातील आणि त्याचा त्रास स्थानिक ग्रामस्थांना होईल. त्यामुळेच साटेली भेडशीच्या हितासाठी विचार करणारे लोक सातत्याने आवाज उठवित आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg