loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत शेठ म. ग. हायस्कूलचे दुहेरी यश

देवगड (प्रतिनिधी) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले. या स्पर्धेत प्रशालेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक, तर १७ वर्षांखालील मुलांच्या संघानेही प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोन्ही संघांची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी सांघिक भावना, शिस्त, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हा विजय मिळवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, संस्थापदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फलित असून, या यशामुळे प्रशालेच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg