loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली अर्बन बँकेचे संचालक माधव शेट्ये यांच्या कामाची दखल; अमेरिकन विद्यापीठाने सन्मानपूर्वक बहाल केली मानाची "डॉक्टरेट" पदवी

दापोली (प्रतिनिधी) : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक माधव शेट्ये यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक, सहकार आणि व्यावसायिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अमेरिकन विद्यापीठाकडून मानाची "डॉक्टरेट" पदवी बहाल करण्यात आली आहे. हा सन्मान दापोली परिसरासाठी आणि सहकार क्षेत्रासाठी अत्यंत भूषणावह मानला जात असून, या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. दापोलीचे सुपुत्र असलेल्या माधव रामचंद्र ऊर्फ एम. आर. शेट्ये यांनी 2001 ते 2003 या कालावधीत दापोली तालुका रोजगार हमी या शासनाच्या समितीचे तालुका अध्यक्ष पद भूषविले होते. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील रस्ते, शेती सिंचनासाठी जव्हार विहिरी शेतकऱ्यांना मंजूर करून ग्राम विकासाला ख-या अर्थाने हातभार लावण्याचे महत्वाचे काम केले होते. तर सन 2023 मध्ये दापोली ते मंडणगड (आंबडवे)भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म गावापर्यंत सुमारे 60 किमी अंतर लांबीची शेतकरी संवाद पदयात्रा काढून शेतीतील अडचणी सोडवणे आणि शासनाने भात, नाचणी, वरी या पिकांचा समावेश रोजगार हमी योजनेत केल्यास पिकाचे क्षेत्र वाढेल रोजगार उपलब्ध होईल, यासाठी जनजागृती करत प्रामाणिक प्रयत्न केला. तर प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या सोबतीने कोकणातील नफ्याची शेती हे यूट्यूब चॅनल सुरू करत शेतीतील लोकशिक्षणाचा अभिनव प्रयोग केला. या त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कामाची दखल घेऊन अमेरिका येथील जागतिक मानवाधिकार आयोग यांनी माधव शेट्ये यांना डॉक्टरेट जाहीर केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेचे माजी उपाध्यक्ष , विद्यमान संचालक श्री माधव रामचंद्र उर्फ एम आर शेट्ये यांना याबाबतचे अधिकृत पत्र विद्यापीठाकडून प्राप्त झाले असून हा पदवीदान समारंभ आज बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या पदवीदान समारंभासाठी ओरिसा राज्याचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनाईक, आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल विश्वभूषण हरिचरण आणि विद्यापीठाचे कुलगुरू तसेच संचालक उपस्थित होते. या सर्वांच्या साक्षीने डॉ. माधव शेट्ये यांना पदवी बरोबरच आयोगाने जागतिक मानवाधिकार संरक्षण समितीचे सभासदत्व बहाल केले आहे. दापोली येथील माधव रामचंद्र ऊर्फ एम.आर.शेट्ये हे प्रगतिशील शेतकरी असून त्यांनी वास्तू शास्त्राचा अभ्यास पुण्याचे धुंडिराज पाठक यांच्याकडे वास्तू व वृक्ष असा विशेष अभ्यास केला आहे. त्यांनी सन 2012 साली आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात भारत - श्रीलंका सहकार परिषदेत दापोली अर्बन बँकेचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्यांनी विविध प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

टाईम्स स्पेशल

विशेषत: त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या पुणे येथील प्रशिक्षण केंद्रात कृषी बँकिंग याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी वर्तमान पत्रात विविध विषयावर लेख लिहिले असून सामाजिक, राजकीय बँकिंग अशा 100 पेक्षा अधिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले आहे. त्याच्या या वाटचालीत कृषीभुषण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे आशिर्वाद तसेच दापोलीचे माजी आमदार डॉ.चंदकांत ऊर्फ भाई मोकल, माजी आमदार स्वर्गीय निशिकांत जोशी, तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान खासदार सुनील तटकरे सहकारमध्ये दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर व स्वर्गीय डॉ.मेहेंदळे यांचे मार्गदर्शन लाभले त्याच्या सामाजिक कामात पुण्याचे स्वर्गीय हरि नरके व डॉ. विकास शेट्ये, प्रा.प्रभाकर शिंदे यांचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg