loader
Breaking News
Breaking News
Foto

तोंडाचा आणि स्तनाच्या कर्करोगाचे वेळेत निदान करण्यासाठी तपासणी करून घेण्याचे अधीक्षक डॉ. बालाजी सगरे यांचे आवाहन

खेड : तंबाखू आणि गुटख्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तींनी कॅन्सरच्या संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बालाजी सगरे यांनी केले आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात तोंडाचा कर्करोग तसेच महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाच्या अनुषंगाने स्क्रीनिंग आणि प्रतिबंधात्मक तपासणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आणि महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, अनेकदा आजाराची लक्षणे वेळीच लक्षात येत नाहीत. त्यामुळे रुग्णाला आजाराचे निदान होईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. परिणामी, उपचारांसाठी मोठ्या शहरांमधील रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहून आवश्यक तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. तंबाखू आणि गुटख्याच्या सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे या व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तोंडात दीर्घकाळ न भरून येणारी जखम, पांढरे किंवा लाल चट्टे, गाठ अथवा तोंड उघडण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे महिलांनीही स्तनाच्या कर्करोगासंदर्भात जागरूक राहून आवश्यक तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झालेल्या स्क्रीनिंग सुविधेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोगाच्या तपासणीसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे.

टाईम्स स्पेशल

त्यामुळे तंबाखू-गुटख्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तींनी तसेच स्तनाच्या कर्करोगाबाबत तपासणीची आवश्यकता असलेल्या महिलांनी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात संपर्क साधून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. बालाजी सगरे यांनी केले आहे. वेळीच तपासणी, योग्य निदान आणि उपचार यामुळे कर्करोगावरील उपचार अधिक प्रभावी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg