loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने सावंतवाडी उभा बाजार येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने सावंतवाडी उभा बाजार येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गांधीजींचे अहिंसेचे विचार व लालबहादूर शास्त्री यांचे साधी राहणी व उच्च विचारसरणी नवीन पिढीला माहिती करून देण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले. तसेच काँग्रेस पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्यांक सेलच्या अध्यक्षपदी नगरसेवक तौकिर शेख यांची नियुक्ती केल्याबद्दल त्यांना नियुक्तीपत्र प्रदेश प्रतिनिधी अँड दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने तौकिर शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, अँड राघवेंद्र नार्वेकर, विनायक ओटवणेकर, अमिदी मेस्त्री, सुमेधा सावंत, आनंद आयरे, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, बाळा नमशी, प्रदीप चौगुले, आफताब हेरेकर, सुभाष नाईक, अन्वर खान, पीटर फर्नांडिस, विनायक सावंत, व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी तौकिर शेख यांना पक्षाचे काम जोमाने करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg