loader
Breaking News
Breaking News
Foto

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या अनुष्का पर्शराम हिची दिल्ली येथील 'कॅम्पस से संसद' कार्यक्रमासाठी निवड

देवळे (प्रकाश चाळके) - देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयामधील तृतीय वर्ष, वाणिज्य वर्गाची विद्यार्थिनी अनुष्का संदीप पर्शराम हिची दिल्ली येथे होणाऱ्या 'कॅम्पस से संसद' या कार्यक्रमांतर्गत नवीन संसद भवन भेटीसाठी निवड झाली आहे. 'कॅम्पस से संसद' हा राज्यसभेचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून सुरू करण्यात आलेला एक उपक्रम असून या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नवीन संसद भवन भेटीसाठी निवड केली जाते. 'कॅम्पस से संसद' या उपक्रमाची निवडीची प्रक्रिया लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यांद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयांमधून राबवली गेली होती. या उपक्रमामध्ये देवरुख महाविद्यालयातून ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सर्वप्रथम या ५० विद्यार्थ्यांची महाविद्यालयाच्या आबासाहेब व कमलाबाई सरदेशपांडे ग्रंथालयात लेखी प्रश्नमंजुषा घेऊन त्यामधून ५ विद्यार्थ्यांची अंतिम मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. आयोजकांनी मुंबईतून ऑनलाईन स्वरूपात घेतलेल्या मुलाखतीमध्ये अनुष्का पर्शराम हिची दिल्ली भेटीसाठी निवड करण्यात आली. यावर्षीच्या या प्रक्रियेद्वारे महाराष्ट्रातील ३१ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातुन अनुष्काची संसद भवन भेटीसाठी निवड झाली आहे. आठवडाभराच्या या अभ्यास कार्यक्रमांतर्गत विविध स्थळांना संशोधन भेट, राष्ट्रपती भवन भेट, राष्ट्रीय युद्ध स्मारक इत्यादी स्थळांच्या भेटीबरोबरच महत्त्वाच्या आस्थापनाशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

टाईम्स स्पेशल

'कॅम्पस ते संसद' या कार्यक्रमाच्या निवड प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रा. स्नेहलता पुजारी, प्रा. संदीप मुळ्ये आणि प्रा. शिवराज कांबळे इत्यादी शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले. अनुष्काच्या निवडीसाठी तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनुष्काचे अभिनंदन करून अभ्यास सहलीसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg