ठाणे:विरोधी पक्षांकडून आंदोलनांच्या नावाखाली पसरवली जाणारी अराजकता, भीडतंत्र (झुंडशाही) आणि केंद्रीय तपास यंत्रणा तसेच प्रशासनाला सातत्याने लक्ष्य करण्याच्या प्रवृत्तीविरोधात आज, १ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने ठाण्यात भव्य ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ (लोकतंत्र बचाव) पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या पदयात्रेच्या निमित्ताने महायुतीने ठाणे शहरात प्रचंड राजकीय शक्तिप्रदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, या पदयात्रेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर आणि यात्रेत एकत्र सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री गणेश नाईक, मंत्री जयकुमार रावल, मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्यासह महायुतीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
सकाळी ९ वाजता पाचपाखाडी येथील ठाणे महापालिकेजवळील परमार्थ निकेतन येथून या पदयात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. हातात पक्षाचे झेंडे आणि घोषणाबाजी करत महायुतीचे हजारो कार्यकर्ते चंदनवाडी, अलमेडा चौक आणि दगडी शाळा मार्गे तलावपाळी येथे पोहोचले. तलावपाळी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोर या पदयात्रेचे विसर्जन झाले. मुख्य रस्त्यांवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर राजकीय आंदोलन, निदर्शने आणि मोर्च्यांमुळे वातावरण कमालीचे तापले आहे. विरोधकांकडून सातत्याने मोर्चे आणि आंदोलने काढून शहरातील शांतता भंग करण्याचा आणि प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर, लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी, समाजातील वाढत्या झुंडशाहीला उत्तर देण्यासाठी तसेच पुढील पिढीपर्यंत लोकशाहीची ताकद पोहोचवण्यासाठीच ही पदयात्रा काढण्यात आल्याचे महायुतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
या भव्य पदयात्रेमुळे ठाणे शहराच्या मुख्य भागांतील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे वाहतूक शाखेने दुपारी २ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती. मात्र, ऐन सुट्टीच्या दिवशी मुख्य रस्ते बंद असल्यामुळे प्रवाशांना आणि वाहनधारकांना काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.