loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचे सुपुत्र एकनाथ बिरवटकर यांना ‘ठाणे भूषण’ पुरस्कार

ठाणे (प्रतिनिधी) - महाराष्ट्र संपादक परिषदेचे मुंबई सचिव तथा ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बिरवटकर यांना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने प्रतिष्ठेच्या ‘ठाणे भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिरवटकर यांना पुरस्काराचे मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकाळ केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ठाणे महानगरपालिकेने बिरवटकर यांची ‘ठाणे भूषण’ पुरस्कारासाठी निवड केली होती. ठाणे शहरातील विविध नागरी, सामाजिक आणि सार्वजनिक प्रश्नांचे सातत्याने वृत्तांकन करताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून दिले. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg