loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवाजी हायस्कूल तुळस येथील विद्यार्थ्यांची आकाश पातळीवर वाटचाल

दोडामार्ग (प्रतिनिधी) - नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० नुसार तसेच शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.० यात दिलेल्या माहितीनुसार प्रवाह, पर्वत व आकाश या विद्यार्थ्यांच्या तीन पातळ्या आहेत. त्यातील आकाश पातळी ही सर्वात उच्चतम पातळी आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आकाश पातळीपर्यंत नेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न शिक्षकांना करावा लागतो. हे विद्यार्थी विषयाच्या सीमांपलीकडे जातात. ते स्वतःच्या कल्पना मांडतात, नवनिर्मिती करतात. सर्जनशीलता कार्यरत होते. दिलेल्या फ्रेमवर्कवर आधारित स्वतः इंग्रजी सारख्या भाषेतून कविता लिहिणे हे आकाश पातळीच्या विद्यार्थ्यांचे उदाहरण आहे. श्री शिवाजी हायस्कूल तुळसचे विद्यार्थी आकाश पातळीपर्यंत पोहोचले आहेत. अशा उत्कृष्ट कविता त्यांनी लिहिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे कार्यरत असणार्‍या शिक्षिका सोनाली प्रेमप्रकाश नाईक यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी Simile, Metaphor, Personification या अलंकारावर आधारित कविता लिहिल्या आहेत. इयत्ता ७ वीच्या वर्गाला विविध अलंकारावर आधारित कविता इंग्रजी भाषेतून लिहिण्याचे आव्हान दिले होते. सान्वी मंगेश चुडजी, खुशी चंद्रशेखर मांजरेकर, आराध्या भगवान मांजरेकर, प्रार्थना शंकर माळकर, मानवी सखाराम आमचेकर, भार्गवी विष्णू परुळकर, सानिका सचिन पांगम, सिया भिकाजी कोचरेकर, स्वरा शंकर घारे, झिलू दिलीप परब, वेदांत सचिन राऊळ, सुरज प्रताप गोळम, आर्यन सुभाष ठुंबरे या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट इंग्रजीमधून स्वरचित कविता लिहिल्या. या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक कोल्हे, तुळसचे केंद्रप्रमुख हिरेमठ यांनी कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, यासाठी शाळेकडून सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. श्री शिवाजी हायस्कूल तुळसच्या या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg