loader
Breaking News
Breaking News
Foto

चित्रकला स्पर्धेत वराडकर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजची रुचिता वराडकर हिचे जिल्हास्तरावर सुयश

मालवण (प्रतिनिधी) - सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाची इयत्ता बारावीतील विद्यार्थिनी रुचिता चंद्रशेखर वराडकर हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेसाठी तिला सहाय्यक शिक्षक समीर चांदरकर व प्रा प्रवीण परुळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिच्या या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव विजयश्री देसाई, सहसचिव साबाजी गावडे मुख्याध्यापिका देवयानी गावडे, पर्यवेक्षक महेश भाट तसेच संस्थेच्या सर्व संचालक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रुचिताने मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg