loader
Breaking News
Breaking News
Foto

रेवंडी सड्यावर तरुणाचा गळफास लावलेल्या स्थितीतील मृतदेह आढळल्याने खळबळ

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील रेवंडी तांडेलवाडी सडा येथील रस्त्यानजीकच्या झाडीत आज ९ वाजण्याच्या सकाळी मिठबाव देवगड येथील श्रीधर गुरुकृष्ण नरे या तरुणाचा झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी दीपक शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर, राजाराम तेरेखोलकर यांनी दाखल होत पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनास्थळी एक मोटरसायकल आढळून आली आहे. या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण केले आहे. घटनेचे नेमके स्वरूप आणि मृत्यूचे कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg