loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजणारी घाटात अपघात सत्र सुरुच, स्विफ्ट कारची पुढे जाणार्‍या व्होक्सवॅगन पोलो कारला जोरदार धडक

लांजा (संजय साळवी) - मुंबई - गोवा महामार्गावरील आंजणारी घाटात अपघातांचे सत्र अजूनही सुरूच असून एका स्विफ्ट कारने पुढे जाणार्‍या व्होक्सवॅगन पोलो कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध श्रीकृष्ण गुण्ये (४३ वर्षे, रा. मठ कडुवाडी, ता. लांजा) हे आपल्या ताब्यातील व्होक्स वॅगन पोलो गाडी (क्र. एमएच ०८ एएन १८१९) मधून आपल्या आईला घेऊन लांजा येथे जात असताना आंजणारी वरचा बस स्टॉपच्या खालील बाजूला घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी त्यांना मागून येऊन एका स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. ही स्विफ्ट कार अतिमट्टू वाडेखेत्तील गोपाकुमार (५० वर्षे, रा. वडगाव बुद्रुक जि. पुणे) हे चालवित होते.

टाईम्स स्पेशल

गोव्याच्या दिशेने जात असताना त्यांचे आपल्या मारुती स्विफ्ट (क्र. एमएच १५ जीएक्स ०७८०) वरील नियंत्रण सुटले आणि पुढे जाणार्‍या व्होक्सवॅगन पोलो या कारला त्यांनी धडक दिली. या अपघातात स्विफ्ट चालक अतिमट्टू गोपाकुमार यांच्या मानेला किरकोळ दुखापत झाली असून इतर कोणतीही हानी झालेली नाही. मात्र अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg