loader
Breaking News
Breaking News
Foto

पुरुष लावणी कलाकार चेतन गावडे यांना 'महाराष्ट्र समाज कलारत्न पुरस्कार' प्रदान

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपणारे आणि पुरुष लावणी कलाकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे रत्नागिरीचे चेतन मनोहर गावडे यांना प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र समाज कलारत्न पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला असलेल्या लावणीला केवळ महिलांची कला म्हणून न पाहता पुरुष कलाकारही तितक्याच ताकदीने आणि कलात्मकतेने सादर करू शकतात, हे चेतन गावडे यांनी आपल्या कलेतून दाखवून दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरुष लावणी कलाकार म्हणून त्यांनी आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि कलेवरील निष्ठेने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.त्याबद्दल लोककलावंत सांस्कृतिक कला मंचच्या वतीने महागायक विष्णू शिंदे यांच्या हस्ते लावणीं नर्तक चेतन गावडे यांचा सत्कार करण्यात आला. लावणी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून या कलेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी चेतन गावडे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या कलाप्रवासाची आणि लावणी कलेतील योगदानाची दखल घेत त्यांना 'महाराष्ट्र समाज कलारत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या आजवरच्या कलाप्रवासातील महत्त्वाचा टप्पा असून या सन्मानामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. या पुरस्काराचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबीयांना, गुरुजनांना, सहकलाकारांना आणि आजवर साथ देणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिले. पुरुष लावणी कलाकार म्हणून महाराष्ट्राच्या लोककलेचा झेंडा अधिक उंचावर नेण्याचा आणि लावणी कलेची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार चेतन मनोहर गावडे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg