संगमेश्वर / सत्यवान विचारे: शासकीय अनुदाना अपहार आणि भ्रष्टाचाराचे नवनवे पायंडे पाडणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील एक हादरवून टाकणारा प्रकार संगमेश्वर तालुक्यात चव्हाट्यावर आला आहे. तांबेडी येथील शिवाजी माध्यमिक विद्यालय गेल्या दोन वर्षांपासून कुलूपबंद असतानाही, कागदोपत्री मात्र शाळा सुरु असल्याचे भासवून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला जात असल्याचे उघडकीस आले आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये स्थानिक केंद्रप्रमुखांपासून ते शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांपर्यंतच्या संपूर्ण यंत्रणेचा ‘आशीर्वाद’ असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शाळा प्रत्यक्ष बंद असल्याने नियमानुसार येथील शिक्षकांना 'अतिरिक्त' घोषित करून त्यांचे इतरत्र समायोजन करणे बंधनकारक होते. मात्र, हा कायदेशीर मार्ग डावलून एका अजब 'कागदी खेळा'द्वारे ही शाळा सुरू ठेवण्यात आली आहे, असे पालकांचे म्हणणे आहे .ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवीच्या वर्गात ‘प्रथमेश वांझोळे’ नावाचा केवळ एकच विद्यार्थी कागदावर दाखवला जात आहे. दिवसातून एखादा शिक्षक काही तासांसाठी हजेरी लावून निघून जातो आणि उर्वरित वेळ शाळेला टाळे असते. अवघ्या एका विद्यार्थ्याच्या जिवावर अख्खी शाळा कागदावर चालवून शिक्षकांचे पगार लाटण्याचा हा अनाकलनीय प्रकार उघड झाला आहे.विकासाचा वारसा अन् ‘व्यापारी’ वृत्ती : सुमारे १०-१५ वर्षांपूर्वी तांबेडीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच (कै.) गणपतराव ब्रीद यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या सोयीसाठी अत्यंत निस्वार्थी भावनेने या माध्यमिक विद्यालयाची उभारणी केली होती. परंतु, दोन वर्षांपूर्वी 'पाटीलकी'चा आव आणणाऱ्या एका शिक्षणसम्राटाने ही शाळा हस्तगत केली. तांबेडी ग्रामपंचायतीने सनदशीर मार्गाने या हस्तांतरणाला तीव्र विरोध दर्शवला होता; मात्र, मूळ उदात्त हेतूला हरताळ फासत हा विरोध मोडून काढण्यात आला आणि कोल्हापूरच्या एका संस्थेकडे सूत्रे सोपवली गेली, असे ग्रामस्थ सांगतात .
शाळेत पटसंख्या नाही असा आभास निर्माण केला जात असला, तरी प्रत्यक्षात परिसरातील १५ ते २० विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी कसबा संगमेश्वर येथे कधी एस टी ने तर कधी पायपीट करत जात आहेत. (काही वेळा एसटीच्या गाड्या वेळेत येत नसल्याने ) स्थानिक मुले उपलब्ध असताना शाळा बंद पाडणे आणि बाहेरच्या विद्यार्थ्यांची बनावट नावे कागदावर नोंदवून शासकीय निधी लाटणे, या प्रकारामुळे गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दररोज शाळेत काय चालले आहे याकडे डोळेझाक करणाऱ्या केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे हे 'मौन' नेमक्या कोणत्या आर्थिक हितसंबंधांमुळे आहे, असा रोखठोक सवाल संगमेश्वरची जनता विचारत आहे.एका विद्यार्थ्याच्या आधारे अतिरिक्त शिक्षकांना वाचवण्याचे हे कारस्थान कोणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे? या सर्व प्रकारामुळे संगमेश्वर शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा बुरखा टराटरा फाटला आहे.


















































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.