loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा; आगामी निवडणुकीत आमदार आमचाच - जाकीर शेकासन

दापोली (वार्ताहर) : आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच आमदार निवडून येणार असल्याचा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी सदस्य जाकीर शेकासन यांनी व्यक्त केला आहे. दापोली आणि मंडणगड तालुक्यात सध्या राजकीय वातावरण बदलत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार मा. सुनील तटकरे यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवत सर्व जाती-धर्मातील आणि सर्व समाजातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जाकीर शेकासन यांनी दापोली मतदारसंघातील सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, मागील काही वर्षांपासून दापोली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. तालुका पातळीपासून ते बूथ पातळीपर्यंत पक्षाचे जाळे मजबूत करण्यात आले आहे. यामध्ये तालुका अध्यक्ष जयवंत, प्रदेश चिटणीस संदीप राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, जालगावकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. साधनाताई बोत्रे, मंडणगड तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

शेकासन यांनी विशेषतः अल्पसंख्यांक समाजाच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले की, खासदार सुनील तटकरे यांनी कोकणच्या विकासासाठी केलेली कामे आणि त्यांची सर्वसमावेशक विकासाची दृष्टी यामुळे अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होत आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी फेक नेरेटिव्ह पसरवून अल्पसंख्यांक समाजाची दिशाभूल केली होती. जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून या समाजाला राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आता या समाजाला सत्य परिस्थिती कळून चुकली आहे. दापोली आणि मंडणगड हा पर्यटन आणि कृषीप्रधान तालुका आहे. या भागातील रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. मंडणगड-दापोली रस्ता, पर्यटन विकास, मत्स्यव्यवसायाला चालना, शैक्षणिक संस्था यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न जनतेला दिसत आहेत. त्यामुळे जनतेचा कौल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने असल्याचे शेकासन यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg