loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी येथे सेवा संकल्प अभियान

रत्नागिरी - ग्रामपंचायत पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी, येथे स्वच्छता हि सेवा व सेवा संकल्प अभियान, व नऊवा राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह, या बाबत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी गजानन धनावडे उपसभापती पंचायत समिती रत्नागिरी, सरपंच ममता अंकुश जोशी, प्रांजल खानविलकर, ग्रामपंचायत सदस्या, विजया कांबळे ग्रामपंचायत सदस्या, सचिन फुटक ग्रामपंचायत अधिकारी, सर्व अंगणवाडी सेविका, सर्व आशा ताई, मदतनीस, बचतगट सी.आर.पी, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षकवृंद, पालक वर्ग उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासनाने सुरु केलेल्या सेवा अभियानाचा लाभ जनतेपर्यंत पोहोचत असून या अभियानामुळे सर्वसामान्य जनतेचा लोकापयुक्त कामांमध्ये सहभाग वाढल्याचे दिसून येते. सेवाकार्यासाठी जनतेची मानसिकता अधिक दृढ झाल्याचे बोलले जाते. शासनाचे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व शासकीय कर्मचारी यांचा समन्वय चांगला असल्याने हे अभियान यशस्वी झाल्याचे उपसभापती गजानन धनावडे यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg