loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजणारी पुलाजवरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गाचे सर्व्हेक्षण होणार?

लांजा (संजय साळवी): मुंबई - गोवा महामार्गावरील आंजणारी पुल येथे सातत्याने होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पर्यायी मार्गाचा सर्व्हे केला जात असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आंजणारी घाटातील अपघातांची संख्या वाढली आहे. गेल्या दोन महिन्यात तरी याठिकाणी १० ते १२ अपघात झाले आहेत. तर गेल्या आठवड्यात कंटेनर आयशर ट्रक यांचे चार अपघात झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या ठिकाणी अवजड वाहनांचे सातत्याने होणारे अपघात ही राष्ट्रीय महामार्ग विभागासमोर मोठी डोकेदुखी ठरली आहे. आंजणारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत. या ठिकाणी गतीरोधक बसवूनही अपघात थांबत नसल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहनांच्या नुकसानी बरोबरच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहतुकीचा आणि प्रवाशांचा खोळंबा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून आंजणारी पुलाला पर्यायी मार्ग शोधला जात आहे. त्यासाठी काजळी नदीमध्ये नव्याने पूल उभारला जावा लागणार आहे. आंजणारी येथील वरचा एस टी. बसस्टॉप येथून हा पर्यायी मार्ग नदीतून काढला जाणार असण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वे केला जात असून सुमारे २० कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे. यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून लवकरच कार्यवाही होण्याची शक्यता व्यक्त होत असून तसे झाल्यास आंजणारी येथील वाहनांचे अपघात रोखण्यास निश्चितच फायदा होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg