loader
Breaking News
Breaking News
Foto

करबुडे येथे राष्ट्रीय पोषण माह व सेवा संकल्प अभियान उत्साहात

रत्नागिरी - एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी २, बीट जाकादेवी १ अंतिर्गत करबुडे ग्रामपंचायत येथे ९ वा राष्ट्रीय पोषण माह आणि 'सेवा संकल्प अभियान' कार्यक्रम पार पडला. या अभियानांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने 'लेक लाडकी योजना', 'प्रधानमंत्री मातृवंदना योजना ' 'मिशन वात्सल्य योजना' आदी योजनांचा समावेश होता. या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत कसा पोहोचवावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य महेश म्हाप, पं. स. सदस्या कांचन नागवेकर, करबुडे ग्रा.पं. चे सरपंच संस्कृती पाचकुडे, प्रकल्प पर्यवेक्षिका एस.एम.पालकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रध्दा कळंबटे उपस्थित होते. या अभियानादरम्यान महिला व बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी पोषणयुक्त आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. जनजागृतीचा भाग म्हणून पोषक तृणधान्ये व भाज्यांवर आधारित आकर्षक पाककृती प्रदर्शन, पोषणविषयक रांगोळी प्रदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ हा नविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. तसेच मातृ वंदना योजना लाभार्थी व लेक लाडकी लाभार्थ्यांसाठी 'आशिर्वादाचा दिवा' आणि अंगणवाडी लाभार्थी व पालक यांचेसाठी 'एक पेड..मॉ के नाम' हे कार्यक्रम घेण्यात आले. मुलगी जन्माला येणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, हा सकारात्मक संदेश समाजामध्ये पोहोचविण्याच्या उद्देशाने या सर्व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवजात मुलींचे कुटुंबीय व उपस्थितांचे स्वागत करून त्यांना सरपंच संस्कृती पाचकुडे यांनी भेटवस्तू देऊन ‘मुलगी म्हणजे घराचा आनंद आणि समाजाची शान’ असा संदेश दिला. मुलीच्या जन्माबद्दल समाजामध्ये असलेले गैरसमज दूर करून मुलगा-मुलगी समान आहेत, त्यांना समान प्रेम, शिक्षण व संधी मिळायला हवी, याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य महेश म्हाप यांनी उत्तम आरोग्य परिपूर्ण पोषण तसेच आनंददायी बालपण याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. पं.स. सदस्या कांचन नागवेकर यांनी कुपोषण निर्मूलन ॲनिमिया मुक्त गाव तसेच महिला सक्षमीकरण याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

सामाजिक कार्यकर्त्या श्रध्दा कळंबटे यांनी सर्व समावेशक पोषण आहार तसेच बाल संरक्षण याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच प्रकल्प पर्यवेक्षिका एस.एम.पालकर यांनी माहिती देताना सांगितले की, अंगणवाडी मध्ये परसबाग सारखा उपक्रम राबविण्यात येत असून या परसबागेतील भाजीपाल्यातून आहारात पोषक घटक, जीवनसत्त्वे व खनिजे मिळाल्याने कुपोषण व आजार दूर राहण्यास मदत होईल तसेच २१ दिवस मुलांना 'नो जंकफूड' बाबत मार्गदर्शन केले. यावेळी करबुडे ग्रामपंचायत सदस्य नेहा रायगडे, रुंजी शितप, लक्ष्मण गावडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विलास वेदरे, सखाराम आग्रे, सुशील तांबे, अनंत कारकर, प्रकाश जाधव, नेहा कांबळे, सचिन पाचकुडे, ग्राम विकास अधिकारी सोनावणे, करबुडे अंतर्गत पोलिस पाटील, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सीआरपी आरोग्य कर्मचारी, माता-पालक, किशोरी मुली व गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg