loader
Breaking News
Breaking News
Foto

मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा!

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनांचे सुलभीकरण करत Government Process Re-engineering (GPR) अंतर्गत लाभार्थींना अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाडीबीटी २.० प्रणालीवर ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजनांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा शुभारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमामुळे राज्यातील मच्छीमार, मत्स्यशेतकरी, मत्स्यव्यावसायिक व मच्छीमार संस्थांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अनावश्यक ऑफलाइन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. उपलब्ध शासकीय डेटाबेसमधून आवश्यक माहिती सहज उपलब्ध होणार असून, विविध प्रमाणपत्रे ऑनलाइन स्वरूपात मिळणार आहेत. तसेच योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार-सिडिंग खात्यात जमा होणार आहे.

टाईम्स स्पेशल

सुलभ प्रक्रिया, कमी कागदपत्रे, जलद सेवा आणि पारदर्शक कार्यपद्धती यामुळे मत्स्यव्यवसायिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे. या लाभार्थीभिमुख उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या : https://mahadbt2.maharashtra.gov.in/

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg