loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ डिसेंबरला; १५ दिवस आधी अर्ज सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

रत्नागिरी, : नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा डिसेंबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवार, दि. ७ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी १ ते २ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लोकशाही दिनात आपले प्रश्न मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाने काही महत्त्वाचे नियम स्पष्ट केले आहेत:

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अर्जदाराने आपला अर्ज विहित नमुन्यात, दोन प्रतींमध्ये आणि लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवणे बंधनकारक आहे. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात थेट अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तालुका लोकशाही दिनात मिळालेल्या उत्तराने अथवा कार्यवाहीने नागरिकांचे समाधान न झाल्यासच, ते जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आपला अर्ज सादर करू शकतात. जिल्ह्यातील ज्या नागरिकांना आपले प्रश्न या व्यासपीठावर मांडायचे आहेत, त्यांनी विहित मुदतीत व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg