loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये बंद वाड्याला भीषण आग, वाड्यासह लाकडे जळून खाक

खेड : शहरातील ब्रह्मकुमारी मार्ग, लाला कडिया रोड परिसरात शुक्रवारी (६ नोव्हेंबर) दुपारी १.४२ वाजण्याच्या सुमारास बंद वाड्याला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण वाड्यासह तेथे साठवून ठेवलेली लाकडे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव आणि सहाय्यक फायरमन प्रणव घाग यांनी सहभाग घेतला. हा वाडा ऋग्वेद संदीप घडशी यांच्या मालकीचा असून आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg