loader
Breaking News
Breaking News
Foto

पाच हजार लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या डॉ. उत्कर्षा कवठणकर यांचा त्र्यंबकेश्वर येथे सन्मान

​सावंतवाडी - मुलांच्या समस्या, पालकत्व, समुपदेशन आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ. उत्कर्षा अजित कवठणकर यांच्या कार्याचा त्र्यंबकेश्वर येथे सन्मान करण्यात येणार आहे. त्यांनी आतापर्यंत सुमारे ५००० लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कार्य केले आहे. दिल्ली येथील Magic Book of Record तर्फे त्यांना मानद डॉक्टरेट, तर इंग्लंड येथील World Record of Excellence तर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. Reiki Healing, Angel Healing, NLP आणि Midbrain Activation या क्षेत्रांतही त्या कार्यरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘जीवनातील समस्यांपासून समाधानापर्यंत’ या उपक्रमातून आगामी काळात १० लाख लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा संकल्प आहे. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनने त्यांच्यावर कोकण विभागाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे ३ व ४ ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आयोजित चौथ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात डॉ. उत्कर्षा कवठणकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. डॉ. उत्कर्षा ह्या कवठणी सरपंच अजित कवठणकर यांच्या सौभाग्यवती असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg