loader
Breaking News
Breaking News
Foto

डोंबिवलीत स्वमग्न मुलांच्या कलाकृतींचे दिवाळी प्रदर्शन; नागरिकांना प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

डोंबिवली (शंकर जाधव) - डोंबिवली पूर्वेकडील स्वामी नारायण मंदिराजवळ संतोष इन्स्टिटयूट फॉर मेंटली चॅलेज चिड्रन ही स्वमग्न मुलांची शाळा आहे. दिवाळी सण जवळ आला की या शाळेत स्वमग्न विद्यार्थी कंदील, पणत्या बनवितात. यावर्षीही शाळेत या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या दिवाळीच्या वस्तू प्रदर्शनाकरता ठेवल्यात आल्याचे या शाळेचे संचालक डॉ. दत्ताराम फोंडे यांनी सांगितले. डोंबिवलीकरांनी या प्रदर्शननाला नक्की भेट द्यावी व या मुलांच्या कलागुणांचे कौतुक करावे असेही फोंडे म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ येथे संतोष इन्स्टिट्यूट फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्नचे ऑटीस्टिक आणि गतिमंद मुलांसाठी शाळा सुरु आहे. आपल्याच शाळेत या वस्तूंचे प्रदर्शनहि भरविले. विशेष म्हणजे आपल्या मुलांच्या अंगी कला पाहून पालकवर्गानी या वस्तू खरेदी केल्या. दरवर्षी प्रमाणे यंदाही या शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळी सणासाठी आकर्षक कंदील, पणत्या, अगरबत्ती, उटणे इत्यादी वस्तू बनविल्या. या वस्तू इतक्या आकर्षक बनविल्या आहेत कि, वस्तू पाहताच या विद्यार्थ्यांच्या अंगी कलागुण असल्याचा पुरावाच दिसतो. या वस्तू मंगळवारी शाळेत प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. पालकवर्ग वस्तू पाहण्यासाठी आवर्जून येतात. प्रदर्शनासाठी या वस्तू अश्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत कि वस्तू पाहताच ग्राहकांना विकत घेण्याचा मोह आवरत नाही.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg