देवगड / प्रतिनिधी :कोकणचा राजा आणि जगभरात अस्सल चव, मोहक सुगंध व दर्जेदार गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या देवगड हापूस आंब्याने यंदाच्या हंगामाची शुभ सुरुवात केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय मुहूर्तावर देवगड येथील वीरेंद्र दत्तात्रय कांबळी तसेच कातवण येथील शेतकरी दिलीप राजाराम तर्फे यांच्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेट्या पुणे बाजारपेठेसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. हंगामाला अधिकृत सुरुवात होण्यापूर्वीच देवगड हापूसने पुणे मार्केटमध्ये एंट्री केल्याने आंबा उत्पादक व व्यापारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
वीरेंद्र कांबळी यांच्या माध्यमातून सहा डझन क्षमतेच्या एकूण तीन पेट्या, तर शेतकरी दिलीप तर्फे यांच्या माध्यमातून पाच डझनची एक आणि साडेपाच डझनच्या तीन पेट्या पुण्याला पाठविण्यात आल्या आहेत. प्रणीत मांजरेकर यांच्या साई आंबा ट्रान्सपोर्टद्वारे या पेट्या पुण्यातील गुलटेकडी मार्केट येथील मे. नामदेव रामचंद्र भोसले (एन.आर.बी., गाळा क्रमांक ९०५/९०६) येथे रवाना करण्यात आल्या आहेत.हंगामाच्या सुरुवातीलाच हापूसचे उत्पादन घेऊन बाजारपेठेत माल पाठविण्याची किमया वीरेंद्र कांबळी आणि दिलीप तर्फे यांनी साधली आहे. बागेची योग्य निगा, उत्पादनाचे नियोजन आणि अनुकूल परिस्थिती यांच्या जोरावर त्यांनी हंगामापूर्वीच उत्पादन घेण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाचे विशेष कौतुक होत आहे.
देवगड हापूसची वैशिष्ट्यपूर्ण चव, सुगंध आणि दर्जा यामुळे पुण्यासह देशातील विविध बाजारपेठांमध्ये त्याला विशेष मागणी असते. पुणे ही हापूसची महत्त्वाची बाजारपेठ असल्याने यंदाच्या हंगामातील पहिल्या पेट्यांना व्यापारी वर्गाकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि किती बाजारभाव मिळतो, याकडे आंबा उत्पादकांचे लक्ष लागले आहे.लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर झालेली ही पहिली पाठवणी देवगडच्या आगामी आंबा हंगामाची गोड चाहूल ठरली असून, यंदा शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन आणि समाधानकारक बाजारभाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.