loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे येथे 10 किमी 'डे रूट मार्च' उत्साहात

खेड (प्रतिनिधी) - शिवतेज आरोग्य सेवा संस्था, खेड संचलित छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे येथे शारीरिक तंदुरुस्ती आणि लष्करी प्रशिक्षणाची पूर्वतयारी या उद्देशाने 10 किलोमीटर अंतराच्या 'डे रूट मार्च' चे आयोजन दिनांक 24 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आले. सकाळच्या प्रसन्न वातावरणात प्रशालेचे कमांडंट श्रीकिशन यादव आणि प्राचार्य डॉ. खोत यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा(Flag off) दाखवून या जोशपूर्ण संचलनास अनुमती देण्यात आली. 'भारत माता की जय' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' च्या जयघोषाने आसमंत दणाणून गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जामगे ते शिवतर या 10 किलोमीटरच्या खडतर मार्गावर सैनिक छात्रांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या रूट मार्चमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या 235 सैनिक छात्रांनी आणि 48 एनसीसी कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. छात्रांसोबत आर्मी विभागाचे शिक्षण निदेशक , सर्व वर्गशिक्षक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे कर्मचारी सहभागी झाले होते. या रूट मार्चचा मुख्य उद्देश छात्रांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती व सहनशीलता, मानसिक दृढता, शिस्त व आज्ञापालन, संघ भावना आणि सहकार्य या गुणांचा विकास करणे हा होता. नियोजित स्थळ शिवतर येथे पोहोचल्यानंतर सकाळ सत्रात विविध सांघिक, वैयक्तिक आणि मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील थकवा क्षणात नाहीसा करून या खेळांनी पुन्हा एकदा चैतन्य निर्माण केले. दुपारी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांची मने जिंकली.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांमधील विजेत्या छात्रांचा गुणगौरव सोहळा प्रशालेचे कमांडंट, प्राचार्य तसेच शिवतर गावचे प्रतिष्ठित नागरिक व महिला भगिनींच्या हस्ते बक्षीस वितरण करून करण्यात आला. यावेळी प्रशालेच्या वतीने शिवतर ग्रामस्थांनी दिलेल्या उत्स्फूर्त सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. संस्थेच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली आणि प्रशालेच्या अचूक नियोजनामुळे हा 10 किमीचा डे रूट मार्च अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg