संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - गावाच्या विकासासाठी आणि भविष्यातील पाण्याची गरज ओळखून गावातील सर्व तरुण, ज्येष्ठ, महिला आणि ग्रामपंचायत एकत्र आले, तर किती मोठा बदल घडू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुंभारखणी खुर्द गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने राबवलेला जलसंवर्धनाचा उपक्रम! यावर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी राहिल्याने गावातील नद्या आणि ओढ्यांमधील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावू लागली आहे. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यानंतर पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये आणि पाण्याचा साठा टिकून राहावा, या उद्देशाने गावातील व वाडीतील ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीने एकत्र येत पुढाकार घेतला.
सकाळी दहा वाजता सर्वजण एकत्र जमले आणि कामाला सुरुवात केली. दगड, माती आणि प्लास्टिक कागदाचा वापर करून त्यांनी बंधारे तयार केले. कोणत्याही मोठ्या साधनसामग्रीची वाट न पाहता, आपल्या गावासाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीने या सर्वांनी उत्स्फूर्त श्रमदान केले. या उपक्रमाला ग्रामपंचायत आणि नाम फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! या बंधाऱ्यांमुळे वाहणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे, तसेच जमिनीत पाणी मुरण्यासही हातभार लागेल. उन्हाळ्याच्या दिवसांत गावाला पाण्याची कमतरता जाणवू नये, यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. ? खरं तर गावाच्या विकासासाठी नेहमीच मोठ्या निधीची किंवा सरकारी योजनेची गरज असते असे नाही. गावातील माणसांची इच्छाशक्ती, एकजूट, श्रमदानाची तयारी आणि ग्रामपंचायतीची योग्य साथ असेल, तर अनेक चांगले उपक्रम प्रत्यक्षात उतरू शकतात.
विशेष म्हणजे या उपक्रमाला तरुण वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती. तरुण म्हणजे गावाची ताकद आणि गावाचे भविष्य! ही ताकद जेव्हा गावाच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सोबतीने एकत्र येते, तेव्हा नक्कीच परिवर्तन घडते. कुंभारखणी खुर्द गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत व तरुणांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. या सर्व ग्रामस्थांचे, तरुणांचे, ग्रामपंचायतीचे आणि नाम फाउंडेशनचे मनापासून कौतुक व अभिनंदन! त्यांच्या या जलसंवर्धनाच्या उपक्रमातून इतर गावांतील तरुणांनाही प्रेरणा मिळावी आणि प्रत्येक गावात असे उपक्रम राबवले जावेत, हीच अपेक्षा आहे.







9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)



















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.