loader
Breaking News
Breaking News
Foto

जानवळे गावच्या सायली शिरगावकर ठरल्या गुहागर तालुका मानाच्या पैठणीच्या मानकरी

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायत (पाटपन्हाळे - शृंगारतळी ) सभागृह येथे दिवाळीच्या सुट्टीत खास महिलांसाठी मनोरंजनाची पर्वणी..!, पारमी प्रॉडक्शन, मुंबई आणि गुहागर तालुका कला मंच प्रस्तुत "खेळ पैठणीचा..! सन्मान होम मिनिस्टरचा..!" या कार्यक्रमात गुहागर तालुका मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या गुहागर तालुक्यातील जानवळे गावच्या सायली प्रमोद शिरगावकर, सायली प्रमोद शिरगावकर यांना मानाची पैठणी, सन्मानचिन्ह, भारतीय संविधान ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या त्रिशूल - साखरी गावच्या मनीषा महेंद्र जाधव, मनीषा महेंद्र जाधव यांना मानाची पैठणी, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच विशेष आकर्षक बक्षिसांच्या मानकरी आबलोली येथील मीनल संदेश कदम, संजीवनी पागडे, रूपांजली पवार, अंकिता सावंत, संजीवनी दयाळकर, पवित्रा शिरगावकर, हेमांगीनी सुधीर चरकरे यांनी विविध खेळात भाग घेऊन आकर्षक बक्षिसे पटकावली. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांना आणि पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला त्यानंतर सांस्कृतिक स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या लोकप्रिय गीतांनी दिवाळीच्या मंगलमय वातावरणात गायक योगेश यशवंत पवार आणि अमित भागुराम पवार ( पंचशील गायन पार्टी तळवली ) यांनी सुरेल गीतांचे सादरीकरण केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पारमी दिपाली रवींद्र पवार हिच्या आकर्षक दमदार एंट्रीने कार्यक्रमाची रंगत वाढली तर प्रमुख सूत्रसंचालक, निवेदक रवींद्र रोहिणी अनंत पवार, सौ. दिपाली रवींद्र पवार यांनी कार्यक्रमाचा उद्देश, पारमी प्रॉडक्शन, मुंबई आणि गुहागर तालुका कला मंच यांची सांस्कृतिक चळवळ तसेच ग्रामीण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करून अनेक संकल्प व्यक्त करण्यात आले त्यानंतर या कार्यक्रमात सूत्रसंचालक रवींद्र रोहिणी अनंत पवार यांनी आपल्या मनोरंजन वक्तव्याने जोश, उत्साह आणि आनंद निर्माण केला. यावेळी महिलांसाठी अनेक खेळ, उखाणे, गमती- जमती, गाण्यांची धमाल करण्यात आली. तसेच विनोदी प्रश्नमंजुषेला ही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी योग्य उत्तर देणाऱ्या महिलांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात महिला - पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते तर प्रत्यक्ष 50 महिलांनी "खेळ पैठणीचा" या कार्यक्रमात सहभाग घेतला. "खेळ पैठणीचा..!सन्मान होम मिनिस्टरचा..!" या कार्यक्रमात स्थानिक कलाकार कुमारी आर्वी रसिका उज्वल पवार हिने सुरेल आवाजात आपली गीते सादर केली तर गुहागर तालुक्यातील वाकी गावचे सुपुत्र आणि संपर्क प्रमुख व प्रतिनिधी विलास सोलकर यांनी विविध कलाकारांच्या आवाजाची नक्कल, विनोदी मिमिक्री आणि जादूचे प्रयोग सादर करून कार्यक्रमात अधिक रंगत आणली आणि रसिकांची मने जिंकली.

टाईम्स स्पेशल

यावेळी आयोजनातील विशेष कामगिरीबद्दल लक्षवेधी सन्मान देऊन सचिन केशव पवार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तर विशेष योगदानाबद्दल उज्वल जनार्दन पवार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संपर्क प्रमुख व प्रतिनिधी विलास सोलकर, प्रशांत भेकरे, संतोष भेकरे, उज्वल पवार, धीरज पवार, सचिन पवार, राजेंद्र मोरे, रवींद्र कदम, अमित भागुराम पवार यांनी मौलिक सहकार्य केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयु. आनंद डी. पवार, आयु. प्रभाकर गणू पवार, आयु. सुनील गोविंद पवार, माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते आयु. सुनील जाधव, रिगल कॉलेज शृंगारतळीचे अध्यक्ष आयु. महेंद्र कदम, आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते आयु. सखाराम लक्ष्मण पवार या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या महिलांना, विशेष बक्षीस विजेत्या महिलांना आणि देणगीदार, जाहिरातदार या सर्वांना सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नीटनेटके नियोजन पारमी प्रॉडक्शन, मुंबई आणि गुहागर तालुका कला मंच यांच्यावतीने करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg