देवगड (प्रतिनिधी) - २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त व सेवा संकल्प अभियानांतर्गत पंचायत समिती देवगडच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचा शुभारंभ पंचायत समिती सभापती गणेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी निलेश जगताप, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत दिपक तेंडुलकर, तिर्लोट समन्वयक रतन दळवी आदी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीस २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाच्या अनुषंगाने पंचायत समिती देवगडच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराला देवगड तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ४० रक्तदात्यांनी नोंदणी केली, तर २० रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती गणेश राणे म्हणाले की, सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, लोकसहभाग वाढविणे, ग्रामस्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबविणे तसेच विकासकामांना गती देणे ही अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. रक्तदानासारखा पवित्र उपक्रम पंचायत समितीच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांनी आयोजक व रक्तदात्यांचे कौतुक केले. तसेच पंचायत समिती देवगडच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या अभियानात महत्त्वपूर्ण काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी निलेश जगताप म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठदान असून सेवा संकल्प अभियानांतर्गत पंचायत समिती देवगडने आयोजित केलेले रक्तदान शिबिर कौतुकास्पद आहे. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी आभार मानले. तसेच सेवा संकल्प अभियानातील विविध उपक्रम लोकसहभागातून यशस्वी करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. समिर मुल्लानी, नर्सिग ऑफिसर सुमंगल बुगडे, समुपदेशक भूषण मळेकर, रक्तपेठी तंत्रज्ञ जोसेफ पिंटो, कांचन परब, परीचर सागर सावंत, मिलींद कांबळी, वाहनचालक नितीन गांवकर, रक्तसिंधुमित्र प्रतिष्ठान जिल्हा उपाध्यक्ष पंढरीनाथ आचरेकर , सर्पमित्र सुरेश कदम आदी उपस्थित होते. या शिबीराचे प्रस्तावणा गटविकास अधिकारी निलेश जगताप, सुत्रसंचलन शिक्षक सचिन जाधव सर तर आभार कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी मानले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.