loader
Breaking News
Breaking News
Foto

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त खेड येथील ऐतिहासिक बौद्धकालीन लेणी येथे ऐतिहासिक भ्रमंती व स्वच्छता मोहीम

खेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासन पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य सहाय्यक संचालक (पुरातत्व), विभागीय कार्यालय, रत्नागिरी आणि महाराजा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक वारसा सप्ताहानिमित्त खेड येथील ऐतिहासिक बौद्धकालीन लेणी येथे ऐतिहासिक भ्रमंती व स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता ही मोहीम घेण्यात आली. आपला ऐतिहासिक वारसा जतन करणे, स्वच्छता राखणे आणि त्याचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय गोगावले, मोहिमेचे नियोजन किरण तायडे, सचिव प्रणव मापुस्कर, मार्गदर्शक सदस्य डॉ. विलास शेळके, सदस्य सुबोध जाधव तसेच स्वच्छता विभागाचे सर्व स्टाफ उपस्थित होते. यावेळी इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.या बौद्ध लेण्यांना जवळपास ५ हजार वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे या लेण्यांची राष्ट्रीय संरक्षित स्मारकामध्ये नोंद व्हावी, अशी मागणी किरण तायडे यांनी यावेळी केली. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी अशा मोहिमा महत्त्वाच्या असून नागरिकांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg