loader
Breaking News
Breaking News
Foto

किरण भैय्या सामंत यांच्या माध्यमातून देवळे गावात 'पाणी अडवा, पाणी जिरवा' मोहीमेला गती

देवळे - कमी पावसाळ्यामुळे पाण्याचा साटा जमिनीतील कमी होणार तो कमी होऊ नये म्हणून आमदार भैय्या सामंत यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावागावात "पाणी आडवा पाणी जिरवा "या माध्यमातून बंधारे बांधण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. दिवाळी गावातील असाच बंधारे बांधण्याचा संकल्प हाती घेतला असून या गावाला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जि.प. उपाध्यक्ष विलास चाळके, दाभोळे जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ कार्यकर्ते विलास भाई बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. शर्वरी वेल्ये( पंचायत समिती सभापती, संगमेश्वर)यांच्या उपस्थितीत, युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या प्रोत्साहानातून, प्रकाश चाळके( ज्येष्ठ पत्रकार), दिनेश (बंड्या) परशेठ्ये (सामाजिक कार्यकर्ते), संजय काळोखे (अध्यक्ष देवळे ग्राम विकास मंडळ मुंबई ) यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना व देवळे ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी राजेश कामेरकर(विभाग प्रमुख, जि. प.गट), लक्ष्मण कदम(विधानसभा संपर्क प्रमुख), प्रसाद अपंडकर (युवासेना तालुका प्रमुख), शुभम गांधी(युवासेना विभाग संघटक), काशिनाथ सकपाळ(उपविभागप्रमुख), हेमंत शिंदे, अंकुश सुर्वे (युवासेना उपविभागप्रमुख), पंकज देवळेकर, प्रणित बेटकर (युवासेना शाखा प्रमुख), समीर आंब्रे (युवासेना शाखा प्रमुख), विनय परशेट्ये, ओंकार शिंदे, शामसुंदर जाधव, आदित्य वळामे, मुन्ना डाफले, संकेत पवार, प्रभात शिंदे यांच्या अथक मेहनतीतून सदर मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg