loader
Breaking News
Breaking News
Foto

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा डेगवे येथून जिल्हास्तरीय शुभारंभ

सावंतवाडी, (प्रतिनिधी) - स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत देशभर ’स्वच्छता ही सेवा’ अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत १ ऑक्टोबर रोजी ’एक दिवस, एक तास, एक सोबत’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रव्यापी श्रमदान कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ ग्रामपंचायत डेगवे (ता. सावंतवाडी) येथे उत्साहात करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अजिंक्य सावंत, गटविकास अधिकारी निलेश जाधव, डेगवे सरपंच राजन देसाई, उपसरपंच मंगेश देसाई, ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई आदी मान्यवर, ग्रामस्थ व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले की, स्वच्छतेचा थेट संबंध नागरिकांच्या आरोग्याशी असतो. त्यामुळे घरासोबतच परिसर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि जलस्त्रोत स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून ती आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन, प्लॅस्टिकचा वापर टाळणे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन ग्रामपंचायत परिसर व सार्वजनिक ठिकाणी श्रमदान केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg